गोंडवाना विद्यापीठ शिक्षक क्रीडा महोत्सव 2023 #chandrapur #spcollegechandrapur #vollyball #badminton #Gondwanauniversitygadchiroli

Bhairav Diwase

चंद्रपूर झोनमधून व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय संघ अव्वल


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ शिक्षक क्रीडा महोत्सव 2023 चंद्रपूर झोन व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन (पुरुष) एकल आणि दुहेरी स्पर्धेत चंद्रपूर झोन मधून सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर संघ अव्वल स्थान पटकाविला. बॅडमिंटन एकल मध्ये प्रथम डॉ. प्रमोद शंभरकर , द्वितीय डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी विजय प्राप्त केला. तर बॅडमिंटन दुहेरी मध्ये प्रथम सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर संघ विजयी झाला. डॉ. प्रमोद शंभरकर, डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी विजय खेचून आणला. बॅडमिंटन (महिला) एकल आणि दुहेरी स्पर्धेत चंद्रपूर झोन मधून सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरचा संघ विजयी                   बॅडमिंटन एकल मध्ये प्रथम डॉ. वैशाली थुल  द्वितीय डॉ. शरयू पोतनूरवार, बॅडमिंटन दुहेरी मध्ये प्रथम सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर  डॉ. वैशाली थुल, डॉ. शरयू पोतनूरवार विजयी झाले.

तर व्हॉलीबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर संघ विजयी झाला. या संघात प्रा. सुनील आर. चिकटे, डॉ. सतीश जी. कन्नाके, डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. निखिल एम. देशमुख, डॉ. राजकुमार एस. बिरादार, प्रा. विकी टी. पेटकर, डॉ. पुरुषोत्तम एस. माहोरे, डॉ.प्रकाश आर.शेंडे, डॉ.प्रकाश आर.बोरकर, अक्षय व्ही.धोटे, प्रो. अमोल जे. कुटेमाते, प्रा. सोहन एम. कोलह्या, डॉ. एन. आर. चिमुरकर प्रशिक्षक विजयश्री खेचून आणला.

संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

#chandrapur #spcollegechandrapur #vollyball #badminton #Gondwanauniversitygadchiroli