सिनेस्टाईलने पकडली 17 लाख 81 हजाराची दारू #chandrapur #gadchiroli #policeगडचिरोली:- अवैध दारु विक्री विरोधात गडचिरोली पोलिस दलाने मोठी कारवाई करत चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात येत असलेली 17 लाख 81 हजार 600 रुपयांची मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गडचिरोली पोलिस विभागाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर चामोर्शी तालुक्यातील हरणघाट मार्गावर सापळा रचून नाकाबंदी लावली. दरम्यान, दारुचे वाहतूक करणारे पिक अप वाहन पोलिसांच्या इशार्‍याश न जुमानता बॅरिकेट तोडून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग केला. वाहनचालकाने कारवाई टाळण्यासाठी वाहन जंगल मार्गाने चामोर्शी व आष्टी परिसरातील वेगवेगळ्या गावात नेले. मात्र, पोलिसांनी 100 ते 125 किमी सतत पाठलाग केल्याने वाहनचालक व साथीदाराने चामोर्शी हद्दीतील सोनापूरजवळ वाहन सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून वाहनचालकासोबत असलेल्या अमित बारई (रा. गौरीपूर ता. चामोर्शी) यास ताब्यात घेतले. मात्र, वाहनचालक राकेश मशीद (रा. गौरीपूर) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.

सदर वाहनात देशी दारुच्या 139 पेट्या व विदेशी दारुच्या seized liquor 5 पेट्या व आढळून आल्या. दारु व वाहतूकीसाठी वारलेले पिक अ‍ॅप वाहन असा एकूण 18 लाख 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलम 353 भादंवी सहकलम 65 (अ), 98 (2), 83, मदाका सहकलम 184 मोवाका अन्वये आरोपी शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपी अमीत बारई यास अटक करण्यत आली आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अनुज तारे, यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राहूल आव्हाड, दिपक कुंभारे, नापोअं अकबर पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पुठ्ठावार, सचिव घुबडे मनोहर येलम, शगीर शेख आदींनी केली आहे.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase #Wardha #crimepatrol #crimenews #crime #police #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #nagpur #pombhurna #Gondwanauniversitygadchiroli #sardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #spchandrapur

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या