अनोळखी व्यक्ती बद्दल माहिती असल्यास पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन #chandrapur #mul

Bhairav Diwase
0

मुल:- दि. १०/०३/२०२३ रोजी रात्री ११:०० वा ते १२:०० वाजताच्या दरम्यान मूल ते चंद्रपूर रोडवर चंद्रपूर दिशेने पायदळ जाणाऱ्या ३२ ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा डोनी फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होवून तो घटनास्थळी मरण पावला आहे.

सदर अनोळखी व्यक्तीबद्दल माहिती असल्यास मूल पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन मूल पोलीस स्टेशन 'कडून करण्यात आले आहे.


मृतकाचे वर्णन:-

रंग काळा सावळा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळ्या रंगाचे २ ते २.५ सेमी लांबीचे, काळया रंगाची दाढी-मिशी १.५ ते २ सेमी लांबीचे केस, प्रेताची उंची ५.४ इंच, चेहरा लांब, अंगात गोल गळयाची हाफ काळी टि-शर्ट व निळसर पांढरा जिन्स फूलपॅन्ट. सदर अनोळखी इसमाबाबत माहिती असल्यास तात्काळ मूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)