आनंद वाईन शॉपचा परवाना रद्द करा नूतनीकरण करण्यात येऊ नये #chandrapur


माजी नगरसेवक सचिन भोयर यांची मागणी


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील सपना टॉकीज चौकाजवळ मुख्य मार्गावर सुरू झालेल्या आनंद वाईन शॉप या दारू दुकानाच्या मालकाने ग्राहकासोबत झालेल्या शाब्दिक बाचाबाची वरून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मागील आठवड्यात मंगळवारी रात्री घडली. यातील जखमीला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दिलीप नरवाडे असे जखमी व्यक्तीचे नाव असून जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 307 गुन्हा दाखल करून दुकान मालक संदीप आडवाणी याला अटक केली आहे. संदीप अडवाणी याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे व त्याला 307 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये जामीन देखील मंजूर झालेला आहे.


याच गोष्टीच्या निषेधार्थ मनसे माजी नगरसेवक सचिन भोयर यांनी सदर दारू दुकानाचा परवाना रद्द करा. नूतनीकरण करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी संजय पाटील, पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्याकडे कार्यवाही करिता दिले आहे.


मद्यप्राश हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. दारू व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी ते समजून घ्यायला हवे.परंतु असे न करता आनंद वाईन शॉप चे संचालक संदीप अडवाणी यांनी जलनगर येथील रहिवासी दिलीप नरवाडे यांच्याशी वाद घालून त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला ही बाब कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने फार गंभीर आहे. आनंद वाईन शॉप हे मध्य विक्रीचे दुकान वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर आहे. या दुकानाला स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही. या दुकानासमोरच तडीरामांची गर्दी राहत असून सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रहदारीच्या मार्गावर असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.रेल्वे मालधक्क्याकडून येणारे जड वाहने देखील आनंद वाईन शॉप पुढूनच निघतात यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो.असे असताना देखील प्रशासन डोळे झाकपणा करीत आहे.नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत आहे म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे सदर आनंद वाईन शॉपचा परवाना रद्द करा त्याचे नूतनीकरण करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे. 

यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्ष प्रतिमा ताई ठाकूर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भोयर, युनिट सचिव मंगेश चौधरी आदी उपस्थित होते. सदर दारु दुकानावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याकरिता प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत