अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे #chandrapurचंद्रपूर:- पोलिस स्टेशन, पडोली हद्दीत ताडाळी ते छोटी पडोली रेल्वे पोल नंबर केएम 864/9 येथे एक इसम मृत अवस्थेत पडून असल्याची लेखी तक्रार फिर्यादी रोहीत प्रकाश दलालने दि. 10 मार्च 2023 रोजी दाखल केली. त्याआधारे, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास पोलिस स्टेशन, पडोली मार्फत करण्यात येत आहे.

सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 30 वर्षे आहे. वर्ण गोरा, उंची 5 फुट, डोक्याचे केस काळे, मिशी बारीक, चेहरा लाबं, अंगात काळया रंगाचा फुल टी-शर्ट, कथ्या रंगाचा लोअर व उजव्या हातावर इंग्रजीमध्ये वामन असे नाव गोदलेले आहे. सदर वर्णनाच्या मृतक व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिस स्टेशन, पडोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या