Click Here...👇👇👇

गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून गुरुदास कामडी यांची अविरोध निवड #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- गोंडवाना गोडवाडा विद्यापीठाची वार्षिक आदि सभा रविवार दिनांक 12 मार्च 2023 ला पार पडली. या सभेत व्यवस्थापन परिषदेचे निवडणूक झाली. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचचे गुरुदास कामडी यांची पदवीधर मतदारसंघातील भटक्या विमुक्त प्रवर्गातून अविरोध निवड झालेली आहे.

व्यवस्थापन परिषदेवर संस्थाचालक राखीव, शिक्षक राखीव, पदवीधर राखीव गटाच्या निवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज आल्याने अनुक्रमे स्वप्निल द़ोंतुलवार, डॉ. संजय गोरे आणि गुरुदास कामडी यांची अविरोध निवड झालेली आहे. उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होऊन त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिक्षण मंचाचे पदवीधर मतदारसंघातून खुल्या प्रवर्गातील प्रशांत दोंतुलवार यांनी विजय मिळवलेला आहे. याच निवडणुकीमध्ये स्थायी समितीमध्ये अभाविप व शिक्षण मंचचे प्राध्यापक धर्मेंद्र मुनघाटे, तक्रार निवारण समिती वर डॉ. शिला नरवाडे यांनी विजय प्राप्त केलेला आहे.

गुरुदास कामडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेले आहे. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश कार्यालय मंत्री,वाशिम जिल्हा संघटन मंत्री, गडचिरोली जिल्हा संघटक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत .भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा महामंत्री म्हणून काम केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. नागपूर विद्यापीठात केंद्र शासन पुरस्कृत मॉडेल कॉलेज (आदर्श महाविद्यालय) गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागात सुरू व्हावे यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये प्रयत्न केलेले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक्रम यासारखे विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत.अनेक प्रश्न त्यांनी अधिसभे मध्ये गाजविलेले आहेत.
   गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या सिनेट निवडणुकी मध्ये पदवीधर मतदारसंघातून भटक्या विमुक्त प्रवर्गातून त्यांनी विजय मिळवलेला होता. आणि व्यवस्थापन परिषदेवर त्यांची अविरोध निवड झालेली आहे. 

याबद्दल आ. डॉ. रामदासजी आंबटकर, आ. डॉ. देवरावजी होळी, शिक्षण मंचचे डॉ. कल्पनाताई पांडे, अभाविप पूर्व अध्यक्ष प्रा. योगेश येनारकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हामहामंत्री राजेंद्र गांधी, संदीप पोशेट्टीवार, गटनेते संजय रामगिरवार, स्वप्नील दोंतुलवार, प्रशांत दोंतलवार प्रा. अरुण प्रकाश प्रा. रुपेंद्रकुमार गौर, भाजप शिक्षक आघाडीचे डॉ. उल्हास फडके, अनिल शिवणकर, जयंत गौरकर, शरद गिरडे, श्रीकांत कुमरे, सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, यश बांगडे, सौ. किरणताई गजपुरे, शशिभूषण वैद्य, स्वरूप तारगे, सतीश चिजघरे डॉ. सागर वझे, पियुष मामिडवार, विजय बदखल, विजय घरत, सतिष पडोळे, डॉ. सुनिल डाखोरे आदींनी व्यस्थापन परिषद तथा सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांचे अभिनंदन केलेले आहे. तसेच पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.