Top News

अखेर "त्या" ग्रामसेवकानी मागितली माफी #chandrapur



सिंदेवाही:- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामाच्या संदर्भात माहिती विचारणाऱ्या एका दैनिकाच्या पत्रकारास ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली असल्याने तालुक्यातील पत्रकार संघटनेने हिसका दाखवताच अखेर ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी सर्व पत्रकार बांधवांची जाहीर माफी मागितली आहे.

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय लाडबोरी येथील रहिवाशी आणि एका दैनिकात वार्तांकन म्हणून काम करीत असलेले पत्रकार सुनील गेडाम यांनी ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांना फोन करून गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत माहिती विचारली असता ग्रामसेवक यांनी अचानक सुनील गेडाम यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे सुरू केले. सुनील गेडाम यांनी सदर प्रकार तालुक्यातील सर्व पत्रकारांना कळविला. त्यामुळे तालुक्यातील अनेक पत्रकार सुनील गेडाम यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे धाव घेतली. आणि सदर प्रकार घडल्याची माहिती पोलिस विभागाला सांगितली.

पोलिसांनी लगेच संबंधित ग्रामसेवक यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलाविले. आणि झालेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता माझी प्रकृती बरी नसून माझी बी.पी. वाढलेली होती. त्यामुळे माझ्या कडून अनवधनाने पत्रकार बंधूंना शिवीगाळ केली. माझे आणि सुनील गेडाम यांचे संबंध अतिशय चांगले असून यापूर्वी मी कधीच सुनील भाऊ, किंवा तालुक्यातील इतर पत्रकार बंधूंना अपशब्द वापरले नाहीत. असे ग्रामसेवक श्रीकांत नन्नेवार यांनी पोलिसांसमोर सांगितले तसेच झालेल्या प्रकाराबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंची जाहीर माफी मागत असून तसा माफीनामा सुद्धा लिहून दिला आहे. पोलिसांनी सुद्धा यावेळी ग्रामसेवक श्रीकांत नन्नेवार यांना चांगलीच समज दिली.

यावेळी पत्रकार म्हणून अमृत दंडवते, बाळू बतकमवार, महेंद्र कोवले, संदीप बांगडे, सुनील गेडाम, खालिद पठाण, मिथुन मेश्राम, आक्रोश खोब्रागडे, अमन पटेल, वीरेंद्र मेश्राम, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू लोणारे, सचिव योगेश बारेकर, ग्रामसेवक अशोक शिंदे, वाकडे, अतुल मेश्राम, इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने