Top News

चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे आंदोलन सुरू #chandrapur


काळे झेंडे दाखवून रेल्वे विभागाचा केला निषेध


चंद्रपूर:- 'आम्ही आपला हक्क मागतोय,नाही कुणाला भीक मागतोय' अशी घोषणाबाजी करीत चंद्रपूरकरांनी मंगळवारी 'रेल्वे अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवा आंदोलन सुरू केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीने विविध मागण्या घेवून हे आंदोलन सुरू केले आहे.

सकाळी 7 च्या सुमारास संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरवात करण्यात आली.जिल्हा सत्र न्यायालयासमोर समितिच्या सदस्यांचे एकत्रीकरण झाल्यावर हा मोर्चा बसस्थानकाकडे वळला.'पुणे गाडी 3 बार,मुंबई गाडी हर वार'अशी घोषणा देत,या आंदोलनकर्त्यांनी नंतर रेल्वे स्टेशन परिसरात निदर्शने केली.

यावेळी नरेंद्र सोनी,पूनम तिवाडीभूपेश भलमे,रमेश बोथरा,अनीश दिक्सित,प्रदीप माहेष्वरी,नरेश लेखवानी,अशोक रोहरा,श्याम सारडा,प्रह्लाद शर्मा,मिलिंद दाभेरे,राजेश सादरानी,शंकरसिंह राजपुरोहित,विनोद बजाज,संजय मंघानी,(सभी सदस्य) अनेक गणमान्य नागरिक श्री चंद्रकांत बजाज, महावीर मंत्री, दिनेश बजाज,सुशील मूंदड़ा,घनश्याम मूंदड़ा, शिव सारडा, सुधीर बजाज, श्रीकांत बजाज,अनिल राठी,श्री राम तोषनीवाल,मिलिंद कोतपलिवार,डॉ प्रफुल भास्करवार,अरविंद सोनी,मनीष चकलनवार,अमित कसनगुटुवार, आशीष खोरिया यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर हे राज्यातील महत्वपूर्ण औद्योगिक महानगर असतांना येथील नागरिकांना रेल्वेच्या असुविधांसाठी सामोरे जावे लागत आहे.यासाठी अनेक वेळा चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीने निवेदन दिले,मंत्री अधिकारी सर्वांच्या भेटी घेतल्या.परंतु 2019 नंतर रेल्वे विभागाचे दुर्लक्ष झाले.12जानेवारी 2023 ला रेल यात्री सुविधा संघर्ष समिती चंद्रपुरात आली,त्यांनीही मागण्यांची दखल घेतली नाही.म्हणून 14 मार्च पासून टप्प्या टप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीने विभागीय रेल्वे प्रबंधक (डीआर एम)तुषारकांत पांडे यांचे देखील लक्ष वेधले होते.

17 मार्चला नागपुरात होणार निदर्शने

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समिती 16 मार्च पर्यंत चंद्रपूर येथे रेल्वे अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखविणार आहेत.यानंतर नागपूर येथील डीआरएम कार्यालयासमोर काळे झेंडे अधिकाऱ्यांना दाखविले जातील अशी माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री यांनी दिली.

आमची सेवाग्राम एक्सप्रेस परत करा

कोरोनामुळे मुंबईसाठी सर्वांना उपयुक्त असलेली गाडी बंद करण्यात आली.ही गाडी सर्वांसाठी जणू संजीवनी होती.ती बंद असल्याने सामान्य प्रवाश्यांचे हाल होत आहे.त्यामुळे आमची सेवाग्राम एक्सप्रेस परत करा,अशी मागणी यावेळी अनेकांनी केली.


बंगाली बांधवांनी केली मागणी

किमान 150 कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यात बंगाली बांधवांचा सहभाग होता. बंगाली बांधवांनी यावेळी हावडा-(कोलकता) साठी मागणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने