सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थिनी खेळाडूंसाठी महिला खेळाडू प्राध्यापिकेची नियुक्ती करा #chandrapur


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्राचार्य यांनी निवेदनाद्वारे मागणी


चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुपरिचित आहातच, अभाविप गेल्या 75 वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करित आहे. अभाविपच्या रचनात्मक कामाशी आपण परिचित आहातच, आभाविप केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी छात्र संघटना आहे.

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे जास्तीत जास्त विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या मधून अधिका अधिक विद्यार्थीनी उत्कृष्ट रितीने खेळ खेळून जास्तीत जास्त मेडल जिंकून येत आहेत. तरिपण या विद्यार्थीनीना उत्तमपणे खेळ शिकविण्यासाठी महाविद्यालयात महिला खेळाडू, प्राध्यापिका यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. नाहितर अ.भा.वि.प. महाविद्यालयात तिव्र अदोलन करेल असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर यांनी प्राचार्य यांना दिले.

यावेळी विभाग संयोजक वैद्यही मुडपल्लीवार, जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, नगर सहमंत्री पियुष बनकर, नगर विस्तारक रुत्रीक कनोजिया, जिल्हा संघटन मंत्री अमीत पटले उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या