22 वर्षीय युवकांनी केला सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार #chandrapur #rajura #torture

नात्यातील युवकाने शाळेतून जंगलात नेऊन केला अत्याचार


राजुरा:- राजूरा शहरातील एका इंग्रजी शाळेत 6 व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर नात्यातीलच एका 22 वर्षीय युवकांने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

3 एप्रिल रोजी पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर खाऊ घेण्यासाठी शाळेतून बाहेर आली असता, तेव्हा तीच्या मागावर असलेल्या युवकाने तिला बोलावले. आता युवक नात्यातील असल्याने मुलगी गेली. घरी पोहचवून देतो असे सांगून त्या युवकाने मुलीला बाईकवर बसून जंगलाकडे घेऊन गेला. दरम्यान शाळेची बस निघण्याची वेळ होऊनही सदर मुलगी न आल्यामुळे बस चालकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती दिली. शाळा प्रशासनाने चौकशी केली असता ती विद्यार्थिनी एका युवकाच्या बाईकवर गेल्याचे समजले.

या विषयीची माहिती मुलीच्या पालकांना देऊन मुलीचा शोध घेण्यास सांगण्यात आले. माहिती कळताच पालकांनी मुलीचा शोध सुरू केला मात्र काही वेळाने मुलगी घरी आली. पालकांनी चौकशी केली असता नात्यातील त्या युवकाच्या बाईकवर शाळेतून आल्याचे तिने सांगितले. यावर पालकांचे समाधान न झाल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली तेव्हा त्या युवकाने मला जंगलात नेऊन अतिप्रसंग केल्याचे मुलीने सांगितले.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पीडितेच्या आईने रात्री उशिरा राजूरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गावात जाऊन त्या युवकाला अटक करून वैद्यकीय तपासणी केली असता मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी 376, 376 अ, ब, 363 तसेच बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत