पोंभुर्णा बाजार समिती निवडणुकीत दिग्गज रिंगणात #chandrapur #electionपोंभूर्णा:- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या दिवशी सोमवारी इच्छुकांची एकच गर्दी झाली. सर्वत्र दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. पोंभूर्णा बाजार समितीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत सहकारी संस्था गटात ३०, ग्रामपंचायत १२, व्यापारी ६, हमाल गटातून २ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

ग्रामीण भागातील राजकारणाची व सत्ताकारणाची आगामी दिशा निश्चित करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच बाजार समित्यांमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीला मुहूर्त लागल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांची मुदतीत अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होती. यात महाविकास आघाडी व भाजपा पॅनल शक्ती प्रदर्शन करीत एकमेका विरुध्द आपले उमेदवारांचे नामांकन दाखल केले आहे. तर काहींनी स्वतंत्र दाखल केले. स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व राखण्यासाठी बाजार समिती महत्वाची मानली जाते. तिच्याद्वारे शेतकऱ्यांच्या संपर्कात राहता येते. त्यामुळे राजकीय पक्षांचे बडे नेत्यांनी ही निवडणूक गांभिर्याने घेतली आहे.

पोंभूर्णा बाजार समितीत महाविकास आघाडी व भाजपा या दोन पॅनलच्या प्रतिस्पर्धांमध्ये लढत रंगणार आहे. काही उमेदवार आपले अर्ज आधीच दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सहकारी संस्था गटात ३० ग्रामपंचायत ११ व्यापारी ६ व हमाल गटातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी कानवटे यांनी सांगितले.

बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भक्कम पॅनल तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यात बहुसंख्य माजी सभापती व संचालकांचा समावेश आहे. सर्वत्र अनेक मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने मोठी चूरस दिसून येणार आहे.
दोन पत्रकारात थेट लढत....

सध्या होऊ घातलेल्या कृऊबा समितीच्या सेवा सहकारी गटाच्या वि.भ.जाती जमाती गटातून भाजपा चे दिलीप मॅकलवार यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) चे आशिष कावटवार यांची थेट लढत पाहायला मिळणार आहे. दिलीप मॅकलवार व आशिष कावटवार हे दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या दैनिक वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्षे काम सांभाळत आहेत. या गटातून दोनच उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असल्याने या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत