Top News

अनोळखी व्यक्ती बद्दल माहिती असल्यास पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन #chandrapur #police #Rajura


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- पोलिस स्टेशन, विरुर स्टेशन हद्दीत मुंडीगेट रेल्वे लाईन पोल नंबर 164/C2-C3 जवळ एक इसम मृत अवस्थेत पडून असल्याची लेखी तक्रार फिर्यादी गोपाल राजकुमार मराठा यांनी दि. 2 मार्च 2023 रोजी दाखल केली. त्याआधारे, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास पोलिस स्टेशन, विरुर स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 25-30 वर्षे आहे. चेहरा- लांब उंची- 5 फुट 4 इंच, बांधा- मजबुत डोक्याचे केस काळे कोंबडा कट व सोल्जर कट असलेला, दाढी- बारीक स्टाईलस, पिकड निळ्या रंगाचा जिन्स, पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. सदर वर्णनाच्या मृतक व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिस स्टेशन, विरुर स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोस्टे विरुर स्टेशन फोन क्रमांक ठाणेदार सा, पोस्टे विरुर ९८३४६७४६६१ मोबाइल नंबर तपासी अंमलदार पोहवा देवाजी टेकाम ९३५६८७३४८४ नापोअ मल्ल्या नरगेवार ९४०५१३६०४४ पोहवा माणीक वाग्दरकर ९५७९९४००७३ पोहवा भुजंगराव कुळसंगे ९५२९२८४४६९

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने