चंद्रपूर जिल्ह्यातला विवान झळकणार 'बबली' चित्रपटात #chandrapur #bablee


चंद्रपूर:- येत्या १४ एप्रिलला 'बबली' चित्रपट प्रदर्शित होणार असून, यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचा विवान वैद्य हा बाल्या नावाच्या भूमिकेत झळकणार आहे.


आनंदनगर येथे वास्तव्यास असणारा विवानला कला क्षेत्रात आवड होती. बारावी झाल्यानंतर पुण्याला आसक्त कलामंच नाट्य संस्थेशी जुळला व आपले स्वप्न पूर्ण करायची वाटचाल करू लागला. गतवर्षी प्रदर्शित झालेला 'मेडियम स्पाईसी' सिनेमात सई ताहाणकर व ललित प्रभाकरसोबत विवानला अभिनय करण्याची संधी मिळाली.

विवान आपल्या फिल्म करियरमध्ये पाऊल टाकत पुढे फिल्म मेकिंग शिकायला मुंबईला गेला आणि अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रात काम करू लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत