चंद्रपूरची दर्शना चौधरी झळकणार आगामी "बबली" चित्रपटात #chandrapur #bablee

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आगामी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार्‍या पेंशन मुव्हीज प्रस्तुत "बबली" मराठी चित्रपटात चंद्रपूरची दर्शना चौधरी हि सुष्मा नावाच्या भूमिकेत झळकणार आहे. पठाणपुरा येथे वास्तव्यास असणारी दर्शनाला कला क्षेत्रात आवड होती. बारावी नंतर शिक्षण घेत असताच करिअरसाठी मुंबईत गेली. नागपूर कलामंच मेराकी नाट्यसंस्थेशी जुळून बरेच प्रयोग केलेत .

या चित्रपटाच श्रेय ती आई वडील व निर्माते सतिश सर यांना देऊ ईश्चिते. जिद्द, चिकाटी आणि घरच्यांच्या सर्पोटमुळे ती या क्षेत्रात जाण्याची स्वप्नं पूर्ण करु शकली. बबली नंतर पाठोपाठ येण्याऱ्या दोन चित्रपटात सुद्धा ती झळकणार आहे. अभिनयासोबतच ड्रेस डिझायनर स्टाइलीश म्हणून बऱ्याच हिंदी सिरीयल्स, वेबसीरीज आणि डिझायनर म्हणून काम नुकताच मराठी चित्रपटात काम केले.