चिमूर:- पोहण्याकरीता गेलेल्या एका तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (19 एप्रिल) सकाळच्या सुमारास घडली. चिमूर पोलिस स्टेशन हद्दीतील गडीतलावात घडलेल्या या घटनेत प्रज्वल रामभाऊ चौधरी (वय २२ रा. पळसगाव) या तरुणाचा मृत्यू झाला.
प्रज्वल रामभाऊ चौधरी आपल्या तिघा मित्रांसोबत पिपर्डा वन हद्दीतील शेती परिसरात असलेल्या गड्डीतलाव येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र त्यांनी तलाव परिसरात गेल्यानंतर पोहण्याचा बेत आखला. काही मित्रांनी पोहण्याला सुरूवात केल्यानंतर प्रज्वल याला राहावले नाही. तो देखील मित्रांपाठोपाठ पाण्यात उतरला. पोहत पोहत तो खोल ठिकाणच्या पाण्यात गेल्याने त्याने गठांगळ्या खायला सुरूवात केली आणि पाण्यात बुडाला. लगेच मित्रांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र मित्र अपयशी ठरले.
पळसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वनपाल विनोद किलनाके, वनरक्षक ठाकरे,वनरक्षक दांडेकर यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. लगेच त्या ठिकाणी चिमूर पोलिसांचा ताफा पोहचला. दुपारच्या सुमारास प्रज्वलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत