Top News

गडचिरोलीच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांत चकमक, एक नक्षली ठार #chandrapur #gadchiroli



गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात आज (शनिवार) सकाळी १० वाजता पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षलवाद्यास ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

🔥🚌नक्सलियों ने एक बस में आग लगा दी

गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात पोलीस जवानांनी एका नक्षलवाद्यास ठार केले आहे. त्याचा मृतदेह जवानांच्या हाती लागला आहे.

💥गढ़चिरौली के जंगल में पुलिस और नक्सलियों के बीच मुठभेड़, एक नक्सली ढेर

घटनास्थळावरून दोन बंदूक आणि इतर नक्षल साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

🛑दोन वाहनांचा अपघात पाच जण गंभीर जखमी

मदतीसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयातून हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले असून घटनास्थळ घनदाट जंगलात असल्याने मदतीसाठी विलंब होत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने