सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी समाजमाध्यमांवर ठेवले 'मी सावरकर' लिहिलेले छायाचित्र #chandrapur #IamSavarkar

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना भाजपाच्या नेत्यांनी समाजमाध्यमावरील प्रोफाईल छायाचित्र बदलवून सावकरांचे छायाचित्र लावले आहे. वनमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सर्व समाज माध्यमावरील प्रोफाईलमध्ये सावकरांचे छायाचित्र लावले आहे. यामध्ये सावरकरांचे छायाचित्र व छायाचित्रावर ‘मी सावरकर’, असे लिहले आहे.

नुकतेच शिंदे गटाने सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी व विरोधकांना घेरण्यासाठी अत्यंत आक्रमक मोहीम भाजपाने हाती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतक्यावरच न थांबता आपल्या ट्विटर हँडलवरील प्रोफाईल छायाचित्र बदलविले आहे. या छायाचित्रात सावरकरांचा फोटो लावला असून त्यावर ‘आम्ही सारे सावरकर’ असं लिहिलं आहे.

त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरचे प्रोफाईल छायाचित्र बदलवून ‘आम्ही सावरकर’ लिहलेले छायाचित्र लावले आहे. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी आपले प्रोफाईल छायाचित्र बदलवून सावरकरांचा फोटो ठेवलेला आहे. वने, सांस्कृतिक तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा फेसबुकवरील छायाचित्र बदलवून ‘मी सावरकर’ लिहलेले सावरकरांचे छायाचित्र लावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)