महाविद्यालयीन शिक्षणही आता 'जीएसटी'च्या कक्षेत? #chandrapur #gadchiroli


गोंडवाना विद्यापीठाने काढले परिपत्रक


गडचिरोली:- देशातील करप्रणालीमध्ये सुधारणा करताना सरकारने नवी करप्रणाली वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रालयाने शिक्षण क्षेत्राचा यात समावेश करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, गोंडवाना विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना १८ टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागणार, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणदेखील आता 'जीएसटी'च्या कक्षेत आल्याचे चित्र आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातून नाराजीचे सूर उमटत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोसळलेल्या रिंग, सिलिंडर तुकड्याबद्दल तपासात धक्कादायक माहिती उघड

गडचिरोलीसारख्या मागास आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, स्थापनेपासून शिक्षणाव्यातिरिक्त इतर कारणांसाठीच हे विद्यापीठ चर्चेत असते. विद्यापीठातील असाच एक निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत संलग्नित महाविद्यालयांवर विविध शुल्क भरताना १८ टक्के वस्तू व सेवा कर लागू करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता.

त्यानुसार सोमवारी ३ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढले, त्यात सर्व संलग्नित महाविद्यालयांना संलग्नीकरण शुल्कासह विविध शुल्क भरताना १८ टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागणार, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा यापुढे परीक्षेसह विविध शुल्क भरताना वस्तू व सेवा कर द्यावा लागणार का? हे पाहावं लागेल.

'जीएसटी' लागू करताना केंद्र शासनाने शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थी व पालकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांना यातून वगळले होते. मग विद्यापीठाने शैक्षणिक कार्यावर अशाप्रकारे वस्तू व सेवाकर लावणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता शिक्षण क्षेत्रातून विचारला जात आहे.

विद्यापीठाला वस्तू व सेवा कर विभागाकडून ज्या बाबींवर कर आकारला जातो, तो कर विद्यापीठाशी संलग्नित संस्थांना किंवा महाविद्यालयांना भरावा लागणार आहे. त्यानुसार विविध शुल्कावर १८ टक्के 'जीएसटी' भरावा लागणार आहे, असे गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठ, वित्त व लेखा अधिकारी, डॉ. चंद्रमौली म्हणाले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली वस्तू व सेवा कर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

काय लिहिलंय परिपत्रकात

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संलग्नित सर्व महाविद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य यांना कळविण्यात येते की, दि. २२.०२.२०२३ रोजी संपन्न झालेल्या मा. व्यवस्थापन परीषद सभेमधील ठरावानुसार पुढिल शैक्षणिक सत्र २०२३-२४ वर्षापासुन ज्या ज्या बाबीवर GST विभागाव्दारे विद्यापीठास GST आकारली जाते त्या त्या बाबीवर विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयावर १८% GST आकारण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठात जमा करण्यात येणाऱ्या 1. Continuation of Affiliation, 2. Yearly Affiliation.3. Permanet Affiliation Fee, 4. New College / Course First Time Affiliation fee, 5. Online Affiliation Processing Fees, 6. University Late Fee 7. Late Fee for (Continuation. Affiliation), 8. Late Fee for ( Yearly Affiliation). 9. Application / Tender Form fess शुल्कावर १८% GST शुल्क आकारुन वित्त व लेखा विभागात भरण्यात यावे याची नोंद घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत