Top News

चंद्रपूरच्या तापमानाची परवा न करता महाकाली यात्रेसाठी भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी chandrapur

छायाचित्र प्रियंका पुनवटकर

चंद्रपूर:- चंद्रपूरची आराध्यदैवत देवी महाकाली देवीची यात्रा सुरु आहे. राज्यभरासह आंध्र व तेलंगणा राज्यातील भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पौर्णिमेपर्यंत येथे भाविकांची मोठी गर्दी राहणार असून त्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

दरवर्षी चैत्रमध्ये देवी महाकालीची मोठी यात्रा येथे भरते. चैत्र शुद्ध षष्ठी ते पौर्णिमपर्यंत महाकाली यात्रा चालत असली तरी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. यंदा गुढीपाडव्यापासून भाविकांची गर्दी दिसु लागलेले आहेत. देवीवर अपार श्रध्दा ठेवून हजारो भक्तदरवर्षी दर्शनासाठी येतात.

गोंडकालीन ऐतिहासिक महाकाली मंदिर निर्मिती व यात्रेची दंतकथा येथे प्रचलित आहे. आता तर भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. यात्रा परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने सजली आहेत.

चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा, तेलंगाना व आंध्रप्रदेशात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी महाकाली अशी तिची ख्याती आहे. त्यामुळे तिचे भक्त चंद्रपूरच्या तापमानाची उन्हाची परवा न करता यात्रेला दरवर्षी येत असतात. यावर्षी मराठवाडा व आंध्र प्रदेशातील भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. जी वाहने मिळतील, त्या वाहनातून भाविक मोठ्या भक्तीने दाखल होत आहेत. यात्रेकरूंच्या वाढत्या गर्दीनुसार यात्रेमध्ये दुकाने सजू लागलेली आहे. झटपट नदीच्या काठावर असलेल्या महाकाली मंदिरात ही यात्रा सुरू झाली. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने