Top News

गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्याकडून जीएसटी शुल्क आकारणार नाही #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversitygadchiroli

वाचा काय म्हणाले कुलगुरू, सिनेट सदस्य

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि. ३ एप्रिल रोजी वस्तू व सेवा कर या संदर्भात परिपत्रक प्रकाशित करण्यात आले. या परिपत्रकाच्या अनुषंगाने विद्यापीठात जमा करण्यात येणारे निरंतर संलग्निकरण, वार्षिक संलग्निकरण, कायम संलग्निकरण, नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यासक्रम बाबतचे शुल्क, ऑनलाईन संलग्निकरण प्रक्रियेचे शुल्क, विद्यापीठात उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निरंतर वा वार्षिक संलग्निकरण करण्यासाठी उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निविदा अर्जाचे शुल्क इत्यांदीवर लावण्यात आलेल्या १८ टक्के वस्तू व सेवा कराचा शुल्काचा भरणा शैक्षणिक सत्र २०२३- २४ पासून गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना भरावयाचा असून सदर शुल्काचा विद्यार्थ्यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड बसवलेला नाही. विद्यार्थ्यांना भरावयाच्या शुल्कावर कोणत्याही प्रकारचे वस्तू व सेवा कर शुल्क गोंडवाना विद्यापिठाकडून विद्यार्थ्यांवर आकारण्यात आलेले नाही. तसे जीएसटी विभागाचे निर्देश नाहीत.

दि. २१ जानेवारी २०२३ रोजी भारत सरकारचे वित्त मंत्रालय, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांचे महसूल विभाग, नागपूर-१ जीएसटी भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर यांच्या कडून संलग्नित महाविद्यालयांना निरंतर संलग्निकरण, वार्षिक संलग्निकरण, कायम संलग्निकरण, नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यासक्रम बाबत शुल्क, ऑनलाईन संलग्निकरण प्रक्रियेचे शुल्क, विद्यापीठात उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निरंतर व वार्षिक संलग्निकरण करण्यासाठी उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निविदा अर्जाचे शुल्क इत्यांदीवर लावण्यात आलेल्या १८ टक्के वस्तू व सेवा कराचा शुल्काचा १८ टक्के वस्तू व सेवा कराचा शुल्काचा २०१७ ते २०२२ कालावधीसाठी करावा तसेच यावर व्याज व पेनाल्टी सुद्धा आकारण्यात आली. या बाबतचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले होते.

सदर शुल्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठात सुद्धा लागू करण्यात येत आहे. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत संलग्नित महाविद्यालयांवर विविध न शुल्क भरणा करतांना १८ टक्के वस्तू व सेवा कर लागू करण्यासंदर्भात ठराव होता. त्यामुळे सोमवारी ३ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढले. त्यात सर्व सलग्नित महाविद्यालयांना संलग्निकरण शुल्कासह विविध शुल्क भरताना १८ टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागणार असे आदेश देण्यात आले होते.

काय म्हणाले कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे 

गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लावण्यात आलेले नाही. विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा आहे. विद्यापीठाने सदोदित विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. याची सर्व विद्यार्थी पालक आणि प्राचार्य तसेच संस्थाचालकांनी नोंद घ्यावी असे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन तसेच वित्त व लेखा अधिकारी डॉ. चंद्रमौली यांनी कळविले आहे.

 

काय म्हणाले सिनेट सदस्य यश बांगडे

परिपत्रकाच्या अनुषंगाने विद्यापीठात जमा करण्यात येणारे निरंतर संलग्निकरण, वार्षिक संलग्निकरण, कायम संलग्निकरण, नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यासक्रम बाबतचे शुल्क, ऑनलाईन संलग्निकरण प्रक्रियेचे शुल्क, विद्यापीठात उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निरंतर वा वार्षिक संलग्निकरण करण्यासाठी उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निविदा अर्जाचे शुल्क इत्यांदीवर लावण्यात आलेल्या १८ टक्के वस्तू व सेवा कराचा शुल्काचा भरणा शैक्षणिक सत्र २०२३- २४ पासून गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना भरावयाचा असून सदर शुल्काचा विद्यार्थ्यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड बसणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी संभ्रमात राहू नये असे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य यश बांगडे यांनी आधार न्युज नेटवर्क शी बोलताना सांगितले.

काय म्हणाले सिनेट सदस्य निलेश बेलखेडे

गोंडवाना विद्यापिठाच्या संकेतस्थळावर दिनांक ३ एप्रिल ला वस्तू व सेवा कर या संदर्भात परिपत्रक काढण्यात आले. या अनुषंगाने निरंतर संलग्निकरण, वार्षिक संलग्निकरण, कायम संलग्निकरण, नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यासक्रम बाबतचे शुल्क, ऑनलाईन संलग्निकरण प्रक्रियेचे शुल्क, विद्यापीठात उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निरंतर वा वार्षिक संलग्निकरण करण्यासाठी उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निविदा अर्जाचे शुल्क इत्यांदीवर लावण्यात आलेल्या १८ टक्के वस्तू व सेवा कराचा शुल्काचा भरणा शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ करावा लागणार यासंदर्भात माहिती होती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु, हा वस्तू व सेवा कर सदर महाविद्यालयाला भरावयाचा असून यामध्ये विद्यार्थ्यांना कुठलेही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावयाचे नाही. याची नोंद सर्व पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी विद्यार्थी पालकांना केली आहे. जर कुठल्याही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना नियमबाह्य अतिरीक्त शुल्काची मागणी करीत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असेही सिनेट सदस्य यांनी आधार न्युज नेटवर्क शी बोलतांना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने