अन् बस थेट दुभाजकावरच चढली #chandrapur #gondpipari #accident


गोंडपिपरी:- चंद्रपूर मार्गे अहेरी बस येत असताना आक्सापूर येथील शिवाजी चौकात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर चढली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी चार, पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री १०:३० च्या सुमारास घडली.

चंद्रपूरकडून अहेरीकडे जाणारी रात्रीची शेवटची बस येत असताना आक्सापूर येथील चौकात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर चढली. यात चार-पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना लगेच गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तसेच घटनेची माहिती कोठारी पोलिस स्टेशनला कळविण्यात आली.

कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून बसमधील प्रवासी व बसला बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. जखमींची प्रकृती स्थीर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत