"ब्रोकरची नाही गरज, आता घर बसल्या मिनिटांत 'असे' बुक करा रेल्वेचे कन्फर्म तिकीट, पाहा स्टेप्स" #chandrapur #IRCTC #railway #ticket #confirm #railwayticketconfirm

प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण सामान्यतः अधिक लोक जास्त अंतराचा प्रवास रेल्वेने करणे पसंत करतात. अनेक सुविधांची उपलब्धता आणि वेळेवर इच्छित स्थळी पोहोचणे हे त्याचे एक कारण आहे. पण, अनेक वेळा तिकीट मिळवण्यासाठी लोकांना खूप प्रयत्न करावे लागतात आणि अनेकदा तर खूप पैसे मोजून ब्रोकरच्या माध्यमातून कन्फर्म तिकीट मिळवावे लागते.

तुम्हाला माहित आहे का? IRCTC द्वारे तुम्ही अगदी कमी वेळात घरी बसून कन्फर्म तिकीट मिळवू शकता? यामुळे तुम्हाला ब्रोकरकडे जाण्याचीही गरज भासणार नाही आणि कमी पैशात कन्फर्म तिकीट मिळेल. IRCTC वर खाते तयार करून कन्फर्म तिकीट कसे मिळवायचे त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

डाऊनलोड करा IRCTC मोबाईल ॲप 
https://play.google.com/store/apps/details?id=cris.org.in.prs.ima

फॉलो करा ही प्रोसेस:

यासाठी तुम्हाला प्रथम irctc.co.in ला भेट द्यावी लागेल, जी IRCTC ची अधिकृत वेबसाइट आहे. येथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी देऊन लॉगिन करावे लागेल. यानंतर तुमचा आयडी तयार होईल, आयडी पासवर्ड तुमच्याकडे येईल. आता तुम्हाला Google Play Store च्या मदतीने तुमच्या मोबाइलवर IRCTC अॅप डाउनलोड करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला ट्रेनच्या तिकीट पर्यायावर जाऊन play my travel वर क्लिक करावे लागेल. आता येथे तुम्हाला तुमची ट्रेन आणि प्रवासाची तारीख निवडावी लागेल आणि नंतर पुढे जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे बाकीचे सोबती जोडावे लागतील आणि त्याचे बुकिंग कन्फर्म करून तुम्हाला ऑनलाइन माध्यमातून तिकीट भरावे लागेल. यानंतर, तुमच्या PNR क्रमांकासह प्रवासाची सर्व माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मेसेजद्वारे प्राप्त होईल. यामध्ये तुमची ट्रेन कोणती आहे, ती किती वाजत सुटणार आहे आणि तुमची सीट आणि कोच कोणता आहे इत्यादी सर्व माहिती उपलब्ध असते.

डाऊनलोड करा confirm ticket मोबाईल ॲप 
https://play.google.com/store/apps/details?id=com.confirmtkt.lite

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत