कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचे बांधकाम करा #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची कार्यकारी अभियंता यांचेकडे मागणी
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचे बांधकाम करण्याबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश शंभरकर यांचेकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील अनेक रस्त्याचे काम प्रलंबित आहे.त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना रस्त्यावरून ये - जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा ते नारंडा फाटा, वनोजा ते वनोजा फाटा, कोडशी(बु)- शेरज(बू)- लोणी - नारंडा फाटा इजिमा ११४,६/५०० ते ८/००, पिपरी ते नारंडा ग्रामा ८९, कोडशी खुर्द ते नवीन कोडशी मार्ग, कुकुडसाथ ते धुनकी रस्ता ग्रामा ७५ रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे निवेदन सादर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)