तालुक्यात आयोजकांवर गुन्हे दाखल
मुल:- मूल तालुक्यात विनापरवानगी नाटकाचे आयोजन केल्याने तालुका प्रशासन व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाटक, शंकरपट, दंडार असे कार्यक्रम भरविण्यात येतात. त्याअनुषंगाने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडून आयोजकांनी नियमानुसार कार्यक्रमाची, प्रयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या हिमतीवर आयोजक परवानगी काढण्यास टाळाटाळ करतात. परिणामी विनापरवानगी नाटकाचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढले असल्याने तालुका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आयोजकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मूल तालुक्यातील चिचाळा येथे ७ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या नाटकाची, तसेच २२ मार्च २०२३ रोजी भेजगाव येथे आयोजित केलेल्या नाटकाची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती.
नाटकाला मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता याबाबत प्रशासनाला कल्पना असणे आवश्यक आहे. जेणेकरून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. व प्रशासनास त्यावर वेळीच उपायोजना करता येईल.
परंतु भेजगाव व चिचाळा गावात कार्यक्रमाला परवानगी न घेता आयोजकांनी नाटकाचे आयोजन करीत प्रचलित कायदेशीर प्रक्रियेला बगल दिली असल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन मूल येथे अपराध क्र. ०११९ / २८ मार्च २०२३ व १२१/२९ मार्च २०२३ अन्वये १८८ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुढे अशा प्रकारच्या नाटकांचे आयोजन करताना पूर्वपरवानगी घेण्याचे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ. रवींद्र होळी व पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी केले आहे.
#theft #warora #chandrapur #gadchiroli #Maharashtra #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #nagpur #arrested #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #accident