महिलेला अश्लिल शिवीगाळ करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात #chandrapur #mul #crime



मुल:- वास्तव्याचे घर पडल्याने निवाऱ्याची सोय म्हणून समाज भवनात बस्तान मांडला खरा परंतू दारुच्या अधीन गेलेला तो महिलांना अश्लील हातवारे व शिविगाळ करुन लज्जीत केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिवदयाळ निलकंठ बांबोडे (४५) रा. नांदगाव (मुल) यास नुकतीच अटक केली.

मुल पोलीस ठाणेअंतर्गत बेंबाळ चौकीच्या हद्दीतील मौजा नांदगाव येथील शिवदयाळ नीलकंठ बांबोडे याचे स्वत:चे घर पडल्यामुळे २ वर्षापासून समाज भवनात राहत आहे. परंतु शिवदयाळ यास दारुचे व्यसन जळले असल्याने नेहमीच वार्डातील लोक व महिलासोबत भांडत असल्याच्या कारणावरून नेहमीच्या जाचाला कंटाळून पत्नी माहेरी गेली. तरीपण दिवसेंदिवस आरोपीची हिंमत वाढल्याने वार्डातील महिलाकरीता त्रासदायक झाले.

दि. २५ एप्रिल ला फिर्यादी महिला आईच्या घराकडे जात असताना आरोपी शिवदयाळ बांबोडे हा समाज मंदिराच्या पायरीवर उभे राहून अश्लिल इशारे व शिविगाळ केल्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी कलम ३५४ (अ), २९४, ५०९, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदराव तितरमारे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत