चंद्रपूर जिल्ह्यात अपघात #chandrapur #pombhurna #accident

चार चाकी वाहनांच्या धडकेत एक ठार तर सहा जखमी

पोंभुर्णा:- तालुक्यातील डोंगरहळदी येथे लग्न समारंभाला लालपेठ चंद्रपूर येथील सहा मित्र आले होते. लग्नाला उशीर असल्याने ते सहा मित्र पोंभुर्णा येथे कामानिमित्त आले. काम पुर्ण करुन ते विवाहस्थळी डोंगरहळदी परत असताना पोंभुर्णा आयटिआय जवळ असलेल्या नाल्या समोर झालेल्या दोन वाहनाच्या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन च्या सुमारास पोंभुर्णा पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली.

मृतकाचे नाव हिमेश दुर्जन देवांग,वय २८ रा. लालपेठ चंद्रपूर, असे असून जखमी मध्ये अंकित डुंबरे वय ३१ रा. लालपेठ चंद्रपूर, आकाश वानखेडे वय २४ रा. लालपेठ चंद्रपूर, दिपक निखोडे वय ३० रा. दुर्गापूर चंद्रपूर, निखिल सोनटक्के रा. बल्लारपुर वय २८ वर्ष सतीश ज्ञानेश्वर हरडे ३० वर्षे असे जखमी चे नाव आहेत.

चंद्रपूर लालपेट येथील सहा युवक विवाह सोहळ्यासाठी डोंगरहळदी येथे आले होते. विवाहाला उशीर असल्याने ते पोंभुर्णा येथे कामानिमित्त आले आपले काम आटोपून पोंभुर्णा येथुन ते निघाले पोंभुर्णा येथुन डोंगळहळदी येथे भरधाव वेगाने जात असताना वळणावर आल्टो क्र. MH 34 BV 3164 अनियंत्रित झाल्याने समोरुन येणाऱ्या इको व्हॅन MH 34 BR 0849 या वाहणाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होती कि आल्टो वाहनाचा चुराडा झाला यात एक ठार झाला तर आल्टो वाहनामधील पाच जण गंभीर जखमी झाले तर इको व्हॅन मधील एक जण गंभीर जखमी झाला.


सामाजिक कार्यकर्ते सुनील कुंदोजवार देवाडा खुर्द यांनी अपघाताची माहिती कळवून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलाविली व जखमींना रुग्णवाहिका मध्ये बसवुन ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यातील हिमेश देवांग याला डाॅक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. मृतकाला वय ३ वर्षे व एक १५ दिवस अशा दोन मुली असल्याचे कळते.

घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले पुढिल तपास ठाणेदार मनोज गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली बि.ज. सुरेश बोरकुटे, व पोंभुर्णा पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत