Click Here...👇👇👇

चिमूर विधानसभेचे माजी आमदाराचे निधन #chandrapur #chimur

Bhairav Diwase
1 minute read


चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी (नलेश्वर) येथील माजी आमदार बाबुराव जसुजी वाघमारे यांचे रविवारी (23 एप्रिल) रात्री आठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

सोमवारी (दि. २४) त्यांच्यावर मोहाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे. त्यांनी सन १९९० ते ९५ सालात चिमूर विधानसभा क्षेत्राकरिता निवडणूक लढविली. यावेळी ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. या विधानसभा क्षेत्राचे पाच वर्ष त्यांनी नेतृत्व केले. या कालावधीत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात विविध विकास कामे केलीत. जनसेवेसाठी ते अविवाहित राहिले. उकृष्ट आमदार म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहे.