नोकरीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

गडचिरोली:- पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्या पाच युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार असून त्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे.

एप्रिल महिन्यात गडचिरोली पोलिसांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. परंतु कागदपत्र छाननीदरम्यान मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून पोलिसांनी पडताळणी केली असता त्यात काही उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट दाखले जोडल्याचे आढळून आले.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. दरम्यान आरोपींना याची चुणूक लागताच ते फरार होण्याच्या मार्गावर होते, मात्र स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पाच युवकांना अटक केली. तर एक आरोपी फरार झाला. पोलीस सूत्रांनी कारवाईला दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आणखी काही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र जोडले असल्याची शंका आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)