Click Here...👇👇👇

निरंतर वाचना शिवाय काहीच शक्य नाही:- शुभम बाहकर #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज आॕफ सायन्स पोंभूर्णा येथे ग्रंथालय विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला होता.
आजच्या या स्पर्धेच्या युगात निरंतर वाचन केल्या शिवाय काहीच शक्य नाही. आपल्याला उर्वरीत आयुष्य सुखात आणि समाधानात काढायचे असेल तर आज अभ्यास रुपी मेहनत विद्यार्थ्यांना करावीच लागेल असे नायब तहसीलदार शुभम बाहकर यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक शुभम बाहकर नायब तहसीलदार पोंभूर्णा, अतुल्य शिक्षा फाउंडेशन चे संचालक डॉ. अतुल परशुरामकर, जेसीआय नागपूरचे विभाग प्रमुख राकेश टेंभुर्णे, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगीनरवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सतीश पिसे ग्रंथपाल यांनी केले तर संचालन कुमारी रोहीणी गुज्जनवार हीने केले तर आभार कुमारी मयुरी बुरांडे हीने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.