इथं तापमान का वाढतय? ही आहेत करणे...
चंद्रपूर:- देश्यातील नव्हे तर जगातील उष्ण शहर अशी ओळख चंद्रपूर शहराची आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तापमान कमी आहे. मात्र चंद्रपूर शहरान तापमानाचा उच्चांक गाठल. 42.02 अंश तापमनाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात चाळीशीचा आकडा तापमानाने गाठला आहे. तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. एप्रिलमध्येच शहरवाशी घामाघूम झालेत. पुढील काही दिवसाची स्थिती यापेक्षा तापदायक असणार आहे.
मागील वर्षी एप्रिल महिना तापदायक...
सन 2022 चा एप्रिल महिना फारच तापदायक ठरला होता.एप्रिल महिन्यातील तापमान 43.6,43,43.2. डिग्री गाठलं होत.महत्वाचे म्हणजे मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच तापमान वाढ सुरु झाली होती. घरातून बाहेर निघणे कठीण झालं होत.
तापमान वाढीचे ही आहेत कारणे...
दरवर्षी चंद्रपूरचे तापमान का वाढतय? याला अनेक करणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे शहरातील प्रदूषण. शहराचं औद्योगीकरण झालं. अनेक उद्योग येथे उभे झालेत. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला हे खरे मात्र त्या सोबतच प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या अतिशय गंभीर विषय असला तरी याकडे कुणी फारसं गंभीरतेने बघत नाही ही मोठी शोकांतिका.
ही आहेत करणे....
विदर्भ हा मध्य भारतात येतो.बंगालची खाळी आणि अरबी समुद्रातील भाश्मी वारे विदर्भात पोहचत नाही.सोबतच इथं झालेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, प्रदूषण तापमान वाढीला कारणीभूत असल्याचं अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं.
अवकाळी मूळ मार्च थंडगार...
मागील वर्षी मार्च महिना चंद्रपूरसाठी ताब्यात ठरला. तापमानाने चाळीशी पार केली होती. मात्र यावर्षी मार्च महिना आणि एप्रिल महिन्यात महिन्याचा पहिला आठवडयात जिल्हात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळं मार्च महिना तापमानाच्या बाबतीत थंड ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत