बाबूपेठच्या उडान पुलावर पुन्हा एक अपघात #chandrapur #accidentचंद्रपूर:- शहरातील बाबूपेठ राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते लालपेठ - बल्लारपूर जाणाऱ्या मार्गावरील उडानपुलावर दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री आठ ते नऊ च्या सुमारास एका दुचाकी चालकाचा भीषण अपघात झाला यात दुचाकीवर बसलेला इसम चक्क पुलावरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


बाबूपेठ परिसरातील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीने वळणावर चक्क उड्डाणपुलाच्या कटघऱ्याला जोरदार धडक दिली यात दुचाकी वर मागे बसलेला इसम उड्डाणपुलाखाली कोसळला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आल्याची माहिती आहे. या मोपेड दुचाकी वाहनाला मागेपुढे कुठेही नंबर प्लेट नाही.

या उड्डाणपुलावर अपघाताची मालिका वाढतच असल्याने उड्डाणपुलावर स्पीड- ब्रेकर Speed Braker व स्ट्रीट लाईट Street Light लावण्यात यावे अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिक करित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत