सरदार पटेल महाविद्यालयात 'डिजिटल मीडिया' वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन #chandrapur
चंद्रपूर:- 'डिजिटल मीडिया'साठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, 'एसईओ' म्हणजे नक्की काय, 'डिजिटल मार्केटिंग' कशा प्रकारे केली जाते, 'ऑनलाईन ट्रॅफिक'चे तंत्र, बातम्यांचा 'ब्लाँग' कसा तयार करावा, 'गुगल ड्राईव्ह' म्हणजे काय? आदी महत्वाच्या संगणकीय विषयांवर सरदार पटेल महाविद्यालयाचे संगणकशास्त्र प्रमुख डॉ. एस. बी. किशोर यांनी मार्गदर्शन केले. Guidance to students on 'Digital Media' in Sardar Patel College
जनसंवाद विभागाच्या विद्यार्थांशी डॉ.किशोर यांनी संवाद साधत प्रात्यक्षिक करुन त्यावर प्रकाश टाकला. सदर विषयावरील उपक्रम महाविद्यालयातील संगणक विभागात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. किशोर यांनी मोबाईलमुळे झालेले बदल, 'बिटनिहाय ऑनलाईन पत्रकारिता', 'ब्लॉगिंग', 'ऑनलाईन रोजगाराची संधी' आणि उत्पन्नाची साधने, 'ऑनलाईन ट्रॅफिकमधील फरक आणि सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियातील फरक यावर विस्तृत प्रकाश टाकला. 'वेबसाईट' निर्मितीचे तंत्र आणि भविष्यातील पत्रकारितेवर सखोल मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्या पुढाकारात हा महत्वपूर्ण उपक्रम पार पडला. यावेळी जनसंवाद विभागप्रमुख डॉ.पी.ए.मोहरीर प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमासाठी जनसंवाद विभागाचे प्रा. संजय रामगिरवार, प्रा. अरविंद खोब्रागडे यांचेही मोलाचे योगदान मिळाले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या