इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आज संपन्न होणार #chandrapur #Adharnewsnetwork

चंद्रपूर:- इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर या शाखेच्या २०२३-२४ वर्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या चमुचे पदग्रहण सोहळा आज स्थानिक गंजवार्ड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर हॉल येथे संपन्न होणार आहे.

डॉ. कीर्ती साने अध्यक्षा, डॉ. कल्पना गुलवाडे सचिव, तर डॉ. अपर्णा देवईकर कोषाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणार आहेत, ह्यावर्षीच्या चमू मध्ये संपूर्ण पदाधिकारी ह्या महिलांच राहणार आहेत हे विशेष ह्या चमू मध्ये उपाध्यक्ष म्हणून डॉ. शलाका मामीडवार, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. ऋतुजा मुंधडा, डॉ. प्रीती चव्हाण, आणि सहसचिव म्हणून डॉ. वृषाली बोन्डगुलवार, डॉ. सोनाली चोपडा, डॉ. समृद्धी आईंचवार, डॉ. यामिनी पंत, डॉ. विनिता दीक्षित सिंग, डॉ. समृद्धी वासनिक, डॉ. ऋचा पोडे काम करणार आहेत, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. करुणा रामटेके, सचिव डॉ. किरण जानवे, व उपाध्यक्षा म्हणून डॉ. प्रिया शिंदे असणार आहेत. ह्या सर्वाना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. नसरीन मावानी, डॉ. प्राजक्ता अस्वार, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या मेडिकोलीगल आघाडीच्या अध्यक्षा डॉ. अल्का कुथे व पश्चिम आशियाच्या मिसेस युनिव्हर्स डॉ. वर्तिका पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशन च्या सर्व सदस्यांनी व संबंधित पाहुण्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, सचिव डॉ. नगीना नायडू व कोषाध्यक्ष डॉ. अमित देवईकर २०२२-२३ च्या चमुने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या