नाल्यात पोहायला गेलेला युवक बुडाला #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील सिद्धार्थ नगर वार्डातील नाल्यात पोहायला गेलेल्या 3 मुलांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावन हिवरकर वय 15 वर्ष राहणार आंबेडकर नगर, बाबूपेठ असे मृतक मुलाचे नाव आहे. सदर युवकाचा मृतदेह आढळला नसून पाण्यात शोध सुरू आहे.


रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धार्थ नगर येथील नाल्यात 3 मुलं पोहायला गेलीत परंतु त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि अजूनही त्याचा मृतदेह आढळले नाही, स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून मृतदेहचा शोध घेणे सुरू आहे. ही खळबळजनक घटना आज दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या घडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)