Click Here...👇👇👇

जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकाचे कामबंद आंदोलन #chandrapur

Bhairav Diwase

चार महिन्यांपासून वेतन न झाल्याने प्रशासनाला इशारा
चंद्रपूर:- महिलांना प्रसूतीपूर्वी तसेच नंतर स्तनदा मातांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत १०२ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे; परंतु, मागील चार महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांचे वेतन झालेले नाही.

😀
कोरोना सारख्या महामारीत आपली व आपल्या परिवाराची जिवाची पर्वा न करता त्यानी सेवा देन्याचे काम केले व करत आहेत परंतु त्यांना योग्य मानधन दिले जात नाहि व दिले जाते तर ४ महिने पर्यंत त्याना वेतनाची वाट पहावी लागते त्याना कत्राटदारामार्फत १०३०० रु वेतन देऊन त्याची बोळवन केली जाते. त्यामुळे या रुग्णवाहिकांच्या चालकांनी निवेदन च्या माध्यमातून संमधीत कंत्राट रद्द करून समान काम समान वेतन देण्याची मागनी केलेली आहे २६-०४-२०२३ पर्यंत पि एफ व थकित वेतन देण्याची मागनी वाहन चालक यांनी केलेली आहे व वेतन न दिल्यास २८-०४-२०२३ एप्रिल पासून बेमुदत कामबंद आदोलन करनार असे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब. मा. मूख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदनातून दिला आहे. सारथी वाहनचालक संघटनेच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. 😀

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, '१०२'
कंपनीकडून कंत्राटी पद्धतीवर
क्रमांकाच्या रुग्णवाहिका आहेत. इनोवेशन प्रा. लिमिटेड जवळपास २७ चालक काम करीत आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला.

यावेळी उपस्थित १०२ रुग्णवाहिकाचे वाहन चालक मनोज अगळे रविन्द्र अंबादे उमेश गोलेपल्लीवार भारत जिवने ओमकर मठपती नवनाथ घोटे सुधाकर रामटेके चुडेश्वर खोब्रागडे बबलू शेख सुनील बोटरे निखिल गंम्पलवार रोहित जामदार प्रशांत पिपरे रवि शेंडे सुभाष मेश्राम नवनाथ धोटे आनंदराव नागोसे पवन भोसकर प्रफुल इटकेलवार व्यंकटेश गेम मनोज मेकतवार भारत बावणे सूनिल बोटरे शिवप्रसाद डांगे आदी उपस्थित होते.