Top News

विद्यार्थ्यांने जाणून घेतले आकाशवाणीचे कामकाज #chandrapur


चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज नेमके कसे चालते हे जाणून घेतले. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हे उद्दिष्ट असलेल्या आकाशवाणी मनोरंजनामध्ये विविध पर्याय उपलब्ध झाले असले तरी आकाशवाणी मात्र श्रोत्यांच्या मनात आपली जागा कायम राखून आहे.

सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जनसंवाद विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांनी चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट दिली. यावेळी जनसंवाद विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज मोहरीर, प्राध्यापक अरविंद खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. जनसंवाद विभाग चे विद्यार्थी शिल्पा आत्राम, प्रणाली रागीट, प्रियंका पुनवटकर, अश्विन गोडबोले, भिमराज बागेसर, शुध्दोधन निरंजने, मुबारक शेख, भैरव दिवसे सहभागी झाले होते.

चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे जेष्ठ उद्घोषक हेमंत शेंडे यांनी केंद्राचे प्रसारण कसे होते हे तंत्रज्ञानाबद्दल समजून सांगितले. आकाशवाणी कार्यक्रम चे अनुभव आणि चर्चा वृत्तांत याविषयीची माहिती कार्यक्रम अधिकारी नंदा गजभिये यांच्याकडून जाणून घेतली. तसेच निवेदिका संगिता लोंखंडे, इंजिनिअर असिस्टंट राजेंद्र देशभ्रतार, प्रसारण अधिकारी उमेश दुपारे, ग्रंथालय व सुचना विलास चारथळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दौऱ्यासाठी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक संजय रामगिरीवर यांचे योगदान मिळाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने