Top News

KGF Chapter 3 Teaser: 1978-1981...! चार वर्ष कुठे होता रॉकी भाई? #Chandrapur #movir #KGFchapter3


KGF Chapter 3 चं ठासू टिझर रिलिज

राजा कृष्‍णप्‍पा बेरिया... उर्फ रॉकी... याच रॉकीनं मृत्यूशय्येवर असलेल्या आपल्या आईला 'एक दिन दुनिया का सारा सोना तुझे लाकर दूंगा...' असं वचन दिलं होतं. राॅकी भाईनं आईला दिलेलं हे वचन अद्याप पूर्ण झालेलं नाहीये आणि म्हणूनच रॉकी भाई संपलेला नाहीये.

प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफच्या दोन्ही चित्रपटांनी बॉलीवूडला मोठा धक्का दिला आहे.कन्नड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत, यशच्या KGF आणि KGF Chapter 2 ने मनोरंजन सृष्टीला पार हादरुन सोडलं. तब्बल तीन वर्षानंतर केजीएफचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.


या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. KGF Chapter 2 गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी रिलीज झाला होता, तेव्हापासून चाहते त्याच्या पुढच्या भागाची म्हणजेच KGF चॅप्टर 3 ची वाट पाहत आहेत. यशचे चाहतेही त्याला वारंवार या चित्रपटाच्या तिसऱ्या भाग कधी येणार याबद्दल विचारत असतात. आता KGF Chapter 2 ला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे, रॉकी भाईच्या पुनरागमनाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. होय आता KGF Chapter 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
KGF Chapter 3 Teaser
👇👇👇👇👇👇

KGF 2 च्या पोस्ट क्रेडिट सीनने कल्पना दिली की प्रशांत नील KGF: Chapter 3 साठी तयारी करत आहे. पण क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून प्रत्येक चाहत्याची स्वतःची थिअरी तयार केली होती. मात्र १४ एप्रिल, चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्यांनी 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये असा इशारा दिला आहे, ज्यामुळे संपूर्ण कथा बदलून जाणार आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर KGF Chapter 2 मध्ये जेव्हा काळ्या पडद्यावर 1978 ते 1981 पर्यंत स्क्रीन अचानक गायब झाली. KGF: Chapter 2 च्या क्लायमॅक्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की, रॉकी सोन्यानं लादलेल्या जहाजासोबत समुद्रात बुडतो. पण रॉकीभाईला स्वत: एक वादळ आहे. त्याच्यापुढे समुद्राच्या लाटांचा काय तो टिकाव लागणार? म्हणूनच राॅकी पुन्हा परत येतोय...


त्यावेळी या चार वर्षांत रॉकीने काय केले, हा प्रश्न आहे. KGF: Chapter 3 ची कथा या चार वर्षांच्या आसपासच फिरेल असा काहीसा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने