सरदार पटेल महाविद्यालयात डिजिटल लॅबचे उद्घाटन संपन्न #digitallab #chandrapur #Nasscom

Bhairav Diwase


चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे nasscom फाऊंडेशन यांच्या तर्फे 20 संगणक उपलब्ध करून देण्यात आले. संगणक विभागातर्फे डिजिटल लॅबचे उद्घाटन सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे दि. २७ एप्रिलला करण्यात आले.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर , प्रमुख पाहुणे मुरलीधर नारा nasscom कार्यक्रम संचालक , प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, संगणक विभागाचे समन्वयक डॉ. एस.बी किशोर, प्रा. डॉ. पंकज ढुमणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहा. प्रा. निशांत शास्त्रकार, प्रास्ताविक संगणक विभागाचे समन्वयक डॉ. एस.बी किशोर, आभार सहा. प्रा. डॉ. रजनी सिंह यांनी मानले.
तर महाविद्यालयातील विद्यार्थी देवेंद्र गोंडे, भाग्यश्री निकोडे, आरती यादव, तृप्ती गौरकार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.