Top News

सिंदेवाही तालुक्यात मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट #sindewahi


ग्रामपंचायत वाकल येथे विविध विकासात्मक कामाची पाहणी
सिंदेवाही:- दिनांक 21 एप्रिल 2023 ला मा. विवेक जॉन्सन मुख कार्यपालन अधिकारी जि. प. चंद्रपूर ह्यांनी ग्रामपंचायत वाकल ला भेट देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली

त्यामध्ये ग्रामपंचायत वाकल येथील वृक्ष लागवड, जिल्हा परिषद शाळा येथील नव्याने तयार केलेला मॉडेल शौचालय, मॉडेल अंगणवाडी, ग्रामपंचायत ने नव्याने तयार केलेले वाचनालय व त्यातील सुविधा, बचत गट च्या वतीने तयार केलेले शेळीपालन व गांडूळ खत प्रकल्प ह्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना नव्याने काय करता येईल ह्या बाबत सूचना सुद्धा करण्यात आल्या.
           
         सोबतच वित्त आयोगात ग्रामपंचायत वाकल ने तरतूद केलेले काम प्रत्येक घरी कचरापेटी वाटप ह्या उपक्रमाची सुरुवात मा.मुख्य कार्यपालन अधिकारी ह्यांचे तर्फे करण्यात आले. त्याचप्रमाणे क्यू. आर. कोडं द्वारे टॅक्स वसुली ह्या उपक्रमाची सुरुवात सुद्धा मा.  मा.मुख्य कार्यपालन अधिकारी सर ह्यांचे हस्ते करण्यात आली.
               
       ह्या प्रसंगी मा. सुक्रे सर संवर्ग विकास अधिकारी पं. स. सिंदेवाही, मा. राहुल पंचभाई सरपंच ग्रामपंचायत वाकल,
मा. दिनेश मांदाडे उपसरपंच ग्रामपंचायत वाकल, मा. बारेकर ग्रामसेवक ग्रामपंचायत वाकल, मा. राहुल चिम्मलवार सदस्य ग्रा. पं. वाकल, मा. मंगला गावतुरे मा. नंदा भोयर मा. नीलिमा पोपटे सदस्य ग्रा. पं. वाकल मा. दुर्वास मंडलवार सदस्य ग्रा. पं. टेकरी मा. नेव्हील सर म. न. रे. गा. सिंदेवाही मा. चचाने आय. सि. आय. फाउंडेशन मा. रमेश मेश्राम रोजगार सेवक मा. श्रीकांत भेंडारे, जगदीश कोकोडे, वामन कोकोडे ग्रा. पं. कर्मचारी,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने