भाऊ-वडिलाची जमिनीच्या वादातून मुलीला मारहाण #chandrapur #bramhapuri


ब्रम्हपुरीBramhapuri:- शेतजमिनीच्या वादातून जन्मदात्या बापाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना आरमोरी रोडवरील गांगलवाडी टी पॉईंट जवळील सात बारा हॉटेलमध्ये घडली.

गांगलवाडी टी पॉईंट जवळ कृषी विभागात कार्यरत असलेले गहिनीनाथ जाधवर यांनी पत्नी कौशल्या यांच्या नावे शेतजमीन घेतली. त्याच गटातील शेतीचा काही भाग गहिनीनाथ जाधवर यांचा साळा रामहरी मारोती लाड यांनी सुद्धा घेतला. त्या जागेवर सात बारा नावाचे हॉटेल जाधवर यांचे साळे रामहरी मारोती लाड यांनी उघडले. कालांतराने त्यांच्या जागेला लागून असलेली आपल्या मुलीची शेतजमीन मारोती लाड यांनी अतिक्रमण करून हडपण्याचा प्रयत्न केला .

याबाबत कृषी अधिकारी जाधवर यांच्या पत्नी कौशल्या जाधवर यांनी सदर वडिलांच्या अतिक्रमणाबाबत पोलीस ठाणे ब्रम्हपुरी व तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्याकडे रीतसर तक्रार केली. त्याअनुषंगाने काल दि. २१ ला तलाठी तथा मंडळ अधिकारी शेतजमिनी वर मौका तपासणीसाठी आले.

दरम्यान कौशल्या जाधवर आपले म्हणणे उपरोक्त अधिकाऱ्यांसमक्ष मांडत असतांना वडील मारोती लाड, भाऊ रामहरी लाड आणि सुजित हटवार यांनी कौशल्या जाधवर यांना शिवीगाळ करीत चपलेने तथा लथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये कौशल्या जाधवर यांच्या छातीची पासळी तुटली असून त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी गंभीर जखमी अवस्थेतील कौशल्या जाधवर यांना ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यासंबंधीची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून वडील मारोती लाड भाऊ रामहरी लाड व सुजित हटवार यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत