चंद्रपूर:- भेंडवी गावात वादळ, वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अदानी सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट) तर्फे उभारण्यात आलेले पेंडाल कोसळून सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. विस्तारीत युनीट सुरु करण्याकरीता दोन दिवसीय जनसुनावणी करण्यात हा पेंडाल उभारण्यात आलेला होता.
भेंडवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अदानी सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट) येथील परिसरात दुसरे युनीट उभारण्यात येणार आहे. या करीता परिसरातील जनतेची गाऱ्हाणे ऐकण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी तसेच हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता जनसुनावणी घेतल्या जाणार होत्या. भेंडवी गावात जिल्हा पाव तालुका पातळीवरील अधिकारी तसेच कंपनीचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जनसुनावणी दरम्यान नागरिकांकरीता पेंडाल लावण्यात आले हेाते. यावेळी नागरिकांची भेंडवीसह बारा गावातील मोठ्या संख्येनी उपस्थित होती. दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. वादळी पावसामुळे नागरिक पेंडालमध्येच थांबले होते. मात्र वादळाचा वेग वाढल्यामुळे लावण्यात आलेला पेंडाल कोसळला. या दुर्घटनेत सहा जण किरकोळ जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात येथे भरती करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत