Top News

जि. प. शाळा मरकागोंदी येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.

जि. प. शाळा मरकागोंदी येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.


राजुरा:- आज दि .1 मे 2023 रोजी जि.प शाळा  मरकागोंदी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 1चे आयोजन करण्यात आले . सर्वप्रथम सर्व  नवीन भरती पात्र मुलांचे त्यांच्या पालकांसोबत पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले  या वेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष चंद्रभान  कोटनाके तथा सर्व सदस्य उपस्थित होते  गावातील नागरीक बचत गट युवक भजन मंडळ  वनसमिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


  शाळेचे मुख्याध्यापक विजय भोयर सर यांनी शाळा पूर्व तयारीची गरज काय ? याविषयी मार्गदर्शन केले  कार्यक्रमांचे संचालन विनायक फुकट सर यांनी केले आभार विनोद मेश्राम यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने