गडचांदुर बस स्थानकासाठी "भिक मांगो आंदोलन #Gadchandur

Bhairav Diwase
0




(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्याचे आर्थिक, औद्योगिक व्यापारी केंद्र व सिमेंट सिटी म्हणून ओळख असलेले गडचांदूर शहर. मात्र गडचांदूर येथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ही सर्व सोयींयुक्त बस स्थानकाची निर्मिती होऊ शकली नाही. परिणामी प्रवाश्यांना रस्त्यावरच तासंतास उभे राहावे लागते. सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस झेलत रस्त्यावरूनच बस पकडावी लागतं आहे. बस स्थानक नसल्याने नागरिकांना रस्त्यावरील हॉटेल व पान टपरीचा आधार घेऊन उभे राहावे लागते. यात लहान मुले, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध मंडळी यांना गैरसोय निर्माण होते आहे. ऊन, वारा, पाऊस असल्यास ही स्थिती अधिकच गंभीर होते आहे.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

गडचांदुर शहरात सुसज्ज बसस्थानक व्हावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे "भीक मांगो आंदोलन" दिनांक २ मे २०२३ वेळ सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदुर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व गडचांदुर नागरिकांनी भीक मांगो आंदोलनात सहभागी व्हावे.

आपले विनीत
वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)