शहरात ट्रकने सायकलस्वारास चिरडले #chandrapur #gadchiroli #accident


गडचिरोली:- गडचिरोली शहरातील कारगिल चौकात ट्रेलर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना दिनांक 1 मे सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. विकास बाबुराव बोगा वय 25 वर्ष रा. गोडलवाही ता. धानोरा जि.गडचिरोली असे या अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.

चंद्रपूरच्या दिशेने गडचिरोली शहरात येणाऱ्या ट्रक ने सायकलस्वारास चिरडले व त्याला 100 ते 200 फूट फरफटत नेले. यात मृत सायकलस्वाराचा मृतदेह छिनविच्छिन्न झाला.

या घटनेची माहिती होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास करीत आहे. मृतक सायकलस्वार हा गडचिरोली शहरात शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या