Top News

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या भीषण अपघात, २ ठार एक गंभीर #chandrapur #gadchiroli #accident



गडचिरोली:- गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायत जवळ एका भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकच्या या भीषण अपघातात २ जण ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. मुकरू गोमसकार (५५ रा. मुरखळा) असे मृत नाव असून एकाची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

मिळालेल्या माहितीनुसार, सूरजागड येथे लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. दरम्यान सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली- चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायत जवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला.

यावेळी ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार यांचा व ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी झाला आहे. अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत अडकला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने