अखेर...! अन्याय निवारण समितीच्या आंदोलनाला आले यश

Bhairav Diwase

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी पतसंस्था मधे झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी आरोपीला अटक करण्याकरीता मागील 25 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्याय निवारण समितीच्या आंदोलनाला अखेर यश आले असून चिमूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चिमूर पोलिसांचे आभार व्यक्त करत तात्पुरते उपोषण मागे घेतले आहे. पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी उपोषणकर्त्याना पेढा भरवित अन्याय निवारण समितीने उपोषण मागे घेतले. या वेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी मनोगतात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल व ग्राहकांचे पैसे लवकर कसे परत होतील त्यावर जास्त भर देऊ असे वक्तव्य केले.

अन्याय निवारण समितीच्या आंदोलनात मोलाची भूमिका बजावणारे जिल्हा परिषद गट नेते डॉ. सतिश वारजुकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस विभागाने आरोपीला अटक करून चालणार नाही तर या पतसंस्थेत गरिबातील गरीब लोकांना पैसा फसला असून तो पैसा त्यांच्या कष्टाचा आहे. त्यामुळे तुम्ही ठेवीदारांना लवकरात लवकर पैसा वापस करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन डॉ सतिश वारजुकर यांनी पोलीस विभागाला केले.

     या वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय गावंडे. दादा दहिकर. अविनाश आगडे. रोशन ढोक. उद्धव डेकाठे. प्रवीण वागे. नाजमा शेख. मनीष पटेल. प्रवीण बारापत्रे. मोरेश्वर बाहूरे. महेश बनकर. तेजराम लांडे. गिरिधर मोहिनकर व अन्य उपोषण उपस्थित होते.