पोंभूर्णा पोलिस स्टेशनची डाक देऊन परत येतांना पोलिस शिपाईचा अपघाती मृत्यू #chandrapur #mul #accident #police


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

पोंभूर्णा:- पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथील पोलिस शिपाई ठाण्यातील डाक मुल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात देऊन टुव्हिलरने परत येत असताना चिरोली गावाजवळ शुक्रवारला संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाला. विशाल गणपत खडके वय ४२ रा. चंद्रपूर असे मृतक पोलिस शिपाईचे नाव आहे. तो पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर होता.

पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे शिपाई पदावर कर्तव्यावर असलेल्या विशाल खडके हा पोलिस ठाण्याची डाक मुल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात देऊन टुव्हीलरने पोंभूर्ण्याला परत येत असताना संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान चिरोली गावानजीक अपघाती मृत्यू झाला. मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत