https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
पोंभूर्णा:- तालुक्यातील मोहाळा(रै) येथील प्रतिष्ठित शेतकरी दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांत चिंतेचे सावट पसरले होते.कुटुंबीयाकडून शोधाशोध सुरु होती. मात्र दहाव्या दिवशी त्या शेतकऱ्याचा मृतदेह नदित आढळला.देवराव गणपती वांढरे वय ४४ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
देवराव वांढरे मोहाडा (रै) येथील प्रतिष्ठित शेतकरी होते. दि.९ मे २०२३ ला पहाटे चार वाजताच्या सुमारास ते झोपेतून उठून घराबाहेर निघून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता.
संबंधिताच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी शोधाशोध केली पण तो कुठेच आढळला नव्हता. पोभूर्णा पोलिस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती.तपास सुरू होता मात्र दहा दिवसानंतर बेपत्ता असलेला शेतकरी देवराव वांढरे याचा शेवटी मृतदेह मोहाडा(रै) गावाजवळील नदित आढळला.
पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे.