चिचडोह बॅरेज मध्ये चार युवकांचा बुडून मृत्यू #chandrapur #Chandrapur #Chamorshi


Google ads.
चामोर्शी:- चामोर्शी नजीकच्या चीचडोह बॅरेजमध्ये चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14 मे रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. गोलू शर्मा वय 30 वर्ष रा. गडचिरोली, महेश घोंगडे वय 24 वय रा. चामोर्शी, प्रफुल येलुरे वय 25 वर्ष रा चामोर्शी शुभम लांजेवार वय 24 वर्ष रा. चामोर्शी असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.


लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले


हे युवक मिञमंडळीसह चीचडोह बॅरेज वर पार्टीसाठी गेले असता पार्टी झाल्यानंतर पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ते पोहण्यासाठी पाण्यात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले यात या चार युवकांचा मृत्यु झाला.

घटनेची माहिती कळताच चामोर्शी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविचछेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चामोर्शी शहरात शोककळा पसरली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत