चंद्रपूर:- काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील दोन दिवसांपासून बाळू धानोरकर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे कुटुंबिय देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्य प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काल मिळत होती. मात्र आज रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. धानोरकर यांना किडनीसंबंधीच्या आजारावर उपचारासाठी आधी नागपूर येथील खासगी उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वीच एअर ॲम्ब्युलन्सने दिल्ली येथे नेण्यात आले होते. तेथे मेदांत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिक्रिया
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत